दिपशिखा


तरंग उठवून काहीसे डोहात माझ्या ....

पावसाने साद आज घातली ..

जरा भिजतच पण हसत म्हणाला तो ..

तुझं भिजणं तू अधांतरी ठेऊ नकोस ..

माझं बरसण मी थांबवणार नाही ..

                                 ....   दिपशिखा

आणि सरतेशेवटी उरते.. एक हक्काची कविता !!

..तीच ती ...

..जिची आर्ततेने वाट बघतो आपण ...

..जी सुचावी म्हणून युगांयुगे जुळवाजुळव करतो करतो शब्दांची....

..हो ..शब्द पण पाणी भरतात खूपदा...

..पण तरीही यमक जुळायला उशीरच होतो बहुदा..

..कारण ..अर्थाला अर्थपूर्ण यश मिळाला...

..तरच ..यमक..जुळतं ...नाही ?

..रंग ..

..प्रेम..

..लावण्या..

..मैफिल..

..गाणं..

..स्मितहास्य..

..शब्द..

..अर्थ..

..राजा..

..साम्राज्य.. 

हे सार काही त्या एका कवितेत सहज सामावत…!


आणि जेंव्हा ती कविता ..सुचते..भेटते..सापडते..शोधते..तुम्हाला ...

तेंव्हा अनायासे ओळी उमटतात या अश्या ...

..तूच अढळपद आहेस खळीचा माझ्या ...

..मी अलगद ओठांवर आलेलं मिश्किल हास्य तुझं ...बिनशर्तपणे ...

....दिठी दिठी शब्द व्हावे ..

...अन सज्ज व्हावा सुगंध पारिजातकाचा ...

...कधी या तीरावर ..

...कधी त्या तिरापाशी..

..सवे लाटांच्या अत्तर होऊन दरवाळावा ...

..हसण्यास उमगले बारकावे नाही जरी ..

..तरी येतेच्छ श्वास घ्यावा आनंदाने इथे..

उरले सुरले ..गमक स्पर्शून जाता....

...ऊन कोवळे व्हावे डोहातले ...